१६. लिंक वर नवोपक्रम अहवाल उपलोड करणे

 


या घटकावरील VIDEO पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लिंक वर नवोपक्रम अहवाल उपलोड करणे या video मध्ये तुमचा नवोपक्रम प्रत्यक्ष लिंक वर कसा अपलोड करायचा आहे याचे  विस्तृत विवेचन केलेले आहे

अत्यंत महत्वाची चेकलिस्ट

नवोपक्रम लिंक भरण्यापूर्वी आपण पुढील तयारी करावी 

1. प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र Pdf फाईल तयार करून ठेवणे.२ MB पेक्षा जास्त नसावी.

2. नवोपक्रम अहवालाची pdf फाईल तयार करून ठेवणे. 5 MB पेक्षा जास्त नसावी.

3. नवोपक्रम अहवालाची Word फाईल तयार करून ठेवणे. 5 MB पेक्षा जास्त नसावी.

4. स्पर्धकांचा स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्कॅन करून ठेवणे.  MB पेक्षा जास्त नसावी.

5. आवश्यकतेनुसार आपल्या व्हिडिओची Youtube वरील लिंक तयार करून ठेवणे.

6. १०० शब्दात नवोपक्रम सारांश तयार करून ठेवणे. १०० पेक्षा जास्त शब्द नसावेत.

7.आपल्या नवोपक्रमाचे नाव मराठीत व इंग्रजीत तयार करून ठेवणे.

हे पूर्णतः तयार करूनच आपण लिंक भरायला सुरुवात करावी.

स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम यापूर्वी या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा. त्यासाठी स्पर्धकाने स्वघोषित प्रमाणपत्र सादर करावे. 

नवोपक्रम शिक्षकांनी स्वतः राबविलेला असावा.याबाबतीत शिक्षकांनी नवोपक्रमाच्या प्रकल्प अहवाला समवेत खालील नमुन्यात प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.

सादर करण्यात आलेला नवोपक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना / मुलांना उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृतिसंशोधन व लघुसंशोधन पाठवू नये.

नवोपक्रम लेखन मराठी, इंग्रजी किंवा हिंदी यांपैकी कोणत्याही एका भाषेत लिहिलेला असावा.

नवोपक्रम टाईप केलेला असावा.टाईपिंग साठी Unicode या Font चाच वापर करावा. फॉन्ट साईझ १२, पेज मार्जिन डावी बाजू दीड इंच व उजवी बाजू, वरील बाजू, तसेच खालच्या बाजूस प्रत्येकी 1 इंच मार्जिन/समास असावा.

हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा सन २०१९-२० किंवा २०२०-२१ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेला असावा.

नवोपक्रम अहवाल शब्द मर्यादा ४००० ते ५००० असावी. फाईल मध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त 5 फोटोंचा समावेश अहवाल लेखनात करावा.

नवोपक्रम फाईल PDF स्वरूपात जोडावी. PDF फाईल 5 MB पेक्षा जास्त नसावी.

स्पर्धकाने आपल्या नवोपक्रमाशी निगडीत इतरांना उपयुक्त होईल असा व्हिडिओ अथवा youtube वर असलेली लिंक नवोपक्रम स्पर्धेच्या लिंक वर विहित ठिकाणी नोंदवावी.

Post a Comment

0 Comments