3. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत सहभागी कोणा- कोणाला होता येते


 

या घटकावरील VIDEO पाहण्यासाठी 

                   येथे क्लिक करा 

१.स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगर पालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अथवा मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. १ली ते १२वीला अध्यापन करणारे असावेत. माध्यमिक शाळांमधील इ. ६वी ते ८वी ला शिकवणारे शिक्षक प्राथमिक स्तर स्पर्धेसाठी गणले जातील.

 २.राज्यातील ICDS विभागाच्या अधिनस्थ अंगणवाडीतील कार्यकर्ती / अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका या स्पर्धेसाठी भाग घेऊ शकतील.

 ३.डी.एल.एड. विद्यालयातील अध्यापकाचार्य व शिक्षणक्षेत्रातील पर्यवेक्षकीय अधिकारी ( केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षण), गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, जेष्ठ अधिव्याख्याता ) या स्पर्धेत भाग घेऊ शकतील.

४.स्पर्धक सध्या MSCERT / प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA) / DIET मध्ये विषय सहाय्यक / DIET अंतर्गत विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असावा.

Post a Comment

0 Comments