बहुप्रतिक्षित वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र लवकरच मिळणार
दिनांक 2 जून 2025 ते 12 जून 2025 या कालावधीत वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या संख्येनुसार काही ठिकाणी तालुकास्तरावर आयोजित करण्यात आलेले वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण घेण्यात आले होते.
या प्रशिक्षणामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रमाणपत्र लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा नुकतेच निर्गमित झाले आहे.
दिनांक 2 जून 2025 ते 12 जून 2025 या कालावधीत पूर्ण दहा दिवस निर्धारित वेळेत उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थीं आणि निर्धारित केल्याप्रमाणे मूल्यमापनात- प्रशिक्षणाअंतर्गत स्वाध्याय +प्रशिक्षण उत्तर चाचणी+ प्रशिक्षणोत्तर वैक्तिक स्वाध्याय+ कृती संशोधन किंवा नवोपक्रम किंवा प्रकल्प= या सर्व प्रकारांमध्ये किमान 50 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रस्तुत प्रमाणपत्रावर प्राचार्य व केंद्र समन्वयक यांची स्वाक्षरी असेल असे पत्रावरून लक्षात येते.
वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण
0 Comments